
शांतपणे पडून आकाशातलं चांदणं डोळ्यात भरून घ्यावं.. !
खुला रस्ता , सुसाट वेग , मैत्र परिवार आणि मस्त
एक Long Drive घ्यावा !
बालवयाची सैर करावी आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी निरागसपणे पुन्हा अनुभावाव्यात !
कॅमेरा घ्यावा आणि सुसाट सुटावा प्रत्येक सुंदर क्षण Catch करत !
CCD मध्ये COFFEE चे MUG , मैत्र परिवार आणि प्रत्येक घोट घ्यावा stuppid gaussips करत !
हातातली छत्री सोडून चिंब भिजावं पावसात आणि त्या प्रत्येक थेंबाचा आस्वाद घ्यावा !
किती ही काम असल ऑफिस मध्ये तरीही वेळ काढून Choclate Shott मारावाच !
आईच्या हातची गरम गरम पुरणपोळी आणि साजूक तूप वाट्टेल तेंव्हा खाता यावं :-)
निवांत वेळ काढून Headphones कानात टाकावेत आणि जुनी गाणी ऐकत बसवीत !
सगळं विसरून झोपी जाव लहान मुल झोपतं अगदी तसच !
आणि
खऱ्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीनी दुःखी होणापेक्षा स्वप्नांच्या जगात राहता यावं ...!!!








