Friday, March 02, 2012

मन आणि मेंदू !!


"मन आणि मेंदू " या विषयावर लिहायचं म्हणजे व. पु. च हे वाक्य आठवल्याशिवाय नक्कीच राहणार नाही

       "माझ्या मनाचा माझ्या मेंदूशी छत्तीसचा आकडा आहे"
       "माझं मन तसं सरळ आहे या मेंदूचाच रस्ता वाकडा आहे"

माणसाचं मन आणि आणि मेंदू हे दोन्ही एकच असत का वेगवेगळ हा प्रश्न कायम पडतो आणि तो प्रश्न माझ्यासाठी
तरी अनुत्तरीतच राहिलाय अजूनही , मेंदूला मन असतं की मेंदू म्हणजेच मन?’ या प्रश्नाच्या उत्तरासाठी जेवढे खोल जावे तेवढे आपण अधिकच गुंत्यात अडकतो.
             आता बघा , जर आपण "मेंदू हेच मन " असं गृहीत धरलं तर कधी ऐकलय का कुठलं गाणं असं " मेंदू तळ्यात - मळ्यात " किंवा " मेरा मेंदू क्योन तुम्हे चाहे ?  "  मेंदू म्हणजे काय ते आपल्याला माहीत असतं. मेंदू दाखवता येतो, पाहता येतो (जरी आपला स्वत:चा मेंदू कुणी प्रत्यक्ष पाहू शकत नसलं, तरी!). याउलट जर मन हे वेगळं काहीतरी आहे मेंदू पेक्षा तर मग हा "मन " नावाचा अवयव नक्की कुठे असतो मानवी शरीरात ..?? हे आजपर्यंत कोणी दाखवलेलं ऐकिवात नाही आलं कुठे ? 
आपण कायम असं म्हणताना ऐकत असतो rather रोजच्या आयुष्यात म्हणत असतो कि अमुक अमुक व्यक्ती मनात आहे , अमुक व्यक्तीचा मनात काही नसतं जे असत ते सगळं अगदी तोंडावर , आज अगदी मनसोक्त उनाडलो , मनापासून वाईट वाटलं , मनात आली ना एखादी गोष्ट मग नक्की करेन वगैरे  वगैरे  पण एकदाही आपल्या तोंडून मेंदू शब्दाचा कुठेच उल्लेख नाही होत. बुद्धी गोष्ट मेंदूशी निगडीत असणं हे सगळ्यांना पटतं ,आपण बुद्धीला चालना मिळणारे बरेच खेळ खेळतो जस कि बुद्धिबळ  , किंवा ते बाजारात उपलब्ध असतात पण कधी मनोबल वाढवणारे खेळ असं ऐकलय का ?? मी तरी ऐकलेलं नाही आठवत .
          असं हि ऐकत असतो कि माणसाचं मन खूप चंचल असत ते सारखं कुठेतरी भटकत असत , त्याचावर कंट्रोल हवं , एखादी व्यक्ती मनाने खूप हळवी आहे किंवा एखादी मनाने दगड आहे म्हणजे ती कायम बुद्धीनेच विचार करणारी असते का ? बुद्धिवादी माणसं कायम मेंदूने विचार करणारी असतात म्हणजे त्यांना मन नसतच का ??
आणि बऱ्याच वेळेस प्रेम हि गोष्ट अली कि मन या संकल्पनेची सांगड हृदयाशी घालतो . मग माणसाचं मन म्हणजे त्याचं हृदय असत का ?असे असंख्य प्रश्न पडतात पण अजून हि मनाजोगं आणि मेंदूला पटणार उत्तर नाही मिळालं !

3 comments: