Monday, January 28, 2013

फूलं !



 
" फूलं " हा शब्द नुसता उच्चारला तरी नानारंगी बहुढंगी फूलं 
डोळ्यांसमोर उभी राहतात त्यांच ते सोंदर्य, त्या रंग छटा, ती आकर्षकता म्हणजे ईश्वरी किमायागारीचा त्याच्या उत्तुंग कल्पनाशक्तीचा जणू जिवंत आविष्कार आहे याच्यापेक्षा वेगळी creativity असूच शकत नाही .. !
हि फुलं नुसती देखणी नसून आपल्याला रोजचा आयुष्यात पण बरच काही सांगून जातात जस की आपल्या जगण्यात कशी सहनशीलता , सृजनता, नम्रता, हवी? , किती हि संकटं आले तरी कस तटस्थपणे त्यांना तोंड देत कायम हसत मुख राहता येईल ? कसा आजूबाजूचा आसमंत आपल्या सुगंधाने अस्तित्वाने उजळून टाकता येईल ?त्यांचाकडे बघून जगण्यातलं नाविन्य कळतं, म्हणूनच प्रत्येक सुंदर क्षण फुलांशिवाय अपूर्णच.. !

 
माणसाने कितीही वैज्ञानिक प्रगती केली असेल, शेतकी शास्त्र किती ही प्रगत झाल असेल किती तरी संकरित फुलाफळांचा नवनवीन जाती निर्माण केल्या असल्या तरी त्या निसर्गाचा कल्पनाशक्तीला त्या फुलांचा रंगसंगतीला , त्याच्या विचारशक्तीला माणूस नाही challenge करू शकणार
फुलाच्या त्या प्रत्येक पाकळीचा स्पर्श ती त्याच्यातली कोमलता, आकर्षकता , कधी त्याला कवीच्या कवितेत नेऊन ठेवते सौंदर्याचा दाखला देण्यासाठी , तर कधी आजारपणातून उठणाऱ्या रुग्णाला जगण्याची नवी उमेद देण्यासाठी , कधी घरात येणाऱ्या पाहुण्यांचा आदर सत्कार करण्यासाठी, थोडक्यात काय तर  
फुलांशिवाय प्रसन्नता असूच नाही शकत मग ते घर असेल किंवा मंदिर असेल कदाचित म्हणूनच हि फुले सर्वाना कायम हवीहवीशी वाटतात .