Monday, January 23, 2012

आठवणींचा साठवणी !!!

शाळा सुटली , पाटी फुटली .........

      "शाळा" चित्रपट पहिला ते हि शाळेतलाच मैत्रिणीसोबत आणि सगळ्या शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या आणि वाटला पुन्हा पाहिलापासून तो शाळा ते कॉलेज चा प्रवास करता आला तर केवढं भारी होईल ना...!
ते पुन्हा सगळा गृहपाठ , वर्गपाठ आणि ते वेळेत पूर्ण नाही झाला म्हणून सांगितलेली काहीही करण आणि  खाल्लेला बाई चा ओरडा , सगळ्यात आधी हात वर करून प्रश्नाचा उत्तर कोण देणार म्हणून लागलेली पैज , पडणारे असंख्य निरागस प्रश्न ..पेन , वह्या , डबे  हे  आपला स्वतःचा किती ही चांगला असला तरी नेहमी मैत्रिणीच आवडायचा आणि  मग आदलाबदल करण्यात पण एक वेगळीच मजा असायची ,  पी टी चा तास जाम आवडायचा अगदी वाट बघायचो , चित्रकलेचा तास आमचा कलादालनात व्हायचा एक छोटीसी खोली होती तिकडे आमचा चित्रकलेचा सरांनी त्यांची प्रतिभाशक्ती वापरून बरेच चित्र काढून लावलेले असायचे आणि ते तास तिकडेच घायचे अगदी दाटीवाटीने अख्खा वर्ग त्या कलादालनात बसायचा , दिवाळीचा आणि उन्हाळ्याचा सुट्ट्या म्हणजे धमाल असायची कारण कॉलनी मधला मित्र मैत्रिणी सोबत  पण तेवढीच मजा करयचो ..! शाळेत असताना पहिला बाकावर बसण्याची धडपड चालायची आणि कॉलेज मध्ये असताना शेवटचा बाकावर बसण्यासाठी .. :-P
      मला अजून ही आठवतंय माझा शाळेतला जिवलग मैत्रिणीचा वाढदिवस होता आम्ही कायम सोबत असायचो त्याही दिवशी मी तिचा सोबतच होते पण मी तिचा वाढदिवस विसरले आणि तिला विश पण नव्हतं केलं मग ती जाम चिडली होती माझावर अर्थात ते चिडणं साहजिक होतं आणि तेंव्हा बर्थडे रेमिन्देर वगैरे प्रकार नसायचा पण त्या रुसव्या फुग्व्यात आणि भांडणात पण मैत्री असायची
   पाहिजे  ती गोष्ट  रडून हट्ट करून मिळायची लहानपणी , खरच व . पु . म्हणतात तसा " आठवणी या मुंग्यांचा वारुळा प्रमाणे असतात वरून अंदाज नाही लावता येत किती आहेत पण एक बाहेर पडली कि तिचा पाठोपाठ असंख्य मुंग्या बाहेर पडतात आणि तशाच आठवणी आठवतायेत पण लिहून लिहून हात दुखतील पण आठवणी काही थांबायचा नाहीत पण त्या कायम काहीतरी शिकुउन जातात ,लक्षात राहतात , प्रसंगी रडवतात आणि कधी हसवतात ही
                            पण असो मी स्वतःला खूप नशीबवान समजते कारण अजून ही माझा सोबत त्या शाळेतल्या आणि कॉलेज मधला मैत्रिणी सोबत आहेत, शाळेतला आणि कॉलेजमधला आठवणीना उजाळा दायला आणि खळखळून हसायला ,अशाच छान छान आठवणींचा साठवणी प्रत्येकाकडेच असतील...
पण पुन्हा ते दिवस नक्कीच नाही परत येणार हेच खरं  !!



Friday, January 13, 2012

"जो भी मैं केहना चाहु , बरबाद करें अल्फाझ मेरे ... "

या Blog वर माझाविषयी मी जे काही लिहिलंय ते वाचून समोरचा असा विचार करत असेल कदाचित या मुलीला अखंड बडबड करण्याची सवय आहे तरीही हिचा मनात काही गुपितं असू शकतात का ?? याचावर मी असा म्हणेन कि काही गोष्टी प्रत्येकाचा आयुष्यात अशा असतात कि त्या कोणाच समोर नाही व्यक्त करता येत आणि मनात ठेवणं तर त्याहून हि कठीण माझासारखा बडबड करणाऱ्या लोकांना.. पण असो या Blog ने माझा सारखा अनेकांना एक सुवर्णमध्य दिलाय आपल वयाक्तिक मत मांडणासाठी .. Thanks to blogger.com!!
 ते माझा एक आवडत गाणं आहे  Rockstar mvi  मधलं " jo bhi main kehna chahu , barbaad karein alfaaz mere " म्हणून मनातले विचार बोलून न दाखवता लिहून ठेवलेलेच बरे  :-P ;-P

Saturday, January 07, 2012

मनातलं गुपित शब्दांचा रुपात ....

अनेकदा खूप गोष्टी बोलायचा राहून जातात आणि मग त्या मनातच राहतात अशा गोष्टी शब्दांचा रूपाने लिहून व्यक्त करणं जास्त सोयीचा होतं त्या साठी असलेलं एक हक्काचा टिकाण जिकडे मी वाट्टेल ते वाट्टेल तेंव्हा व्यक्त करू शकते ...अगदी मनसोक्त ....

Friday, January 06, 2012

किडेगिरी एक उनाड खुळेपणा !

life is only abt living KAMINAGIRI KIDEGIRI FALTUGIRI So khob Enjoygiri karne ka aur fulltoo DADAGIRI se jineka bole to ZNMD