![]() | ||
| शाळा सुटली , पाटी फुटली ......... |
ते पुन्हा सगळा गृहपाठ , वर्गपाठ आणि ते वेळेत पूर्ण नाही झाला म्हणून सांगितलेली काहीही करण आणि खाल्लेला बाई चा ओरडा , सगळ्यात आधी हात वर करून प्रश्नाचा उत्तर कोण देणार म्हणून लागलेली पैज , पडणारे असंख्य निरागस प्रश्न ..पेन , वह्या , डबे हे आपला स्वतःचा किती ही चांगला असला तरी नेहमी मैत्रिणीच आवडायचा आणि मग आदलाबदल करण्यात पण एक वेगळीच मजा असायची , पी टी चा तास जाम आवडायचा अगदी वाट बघायचो , चित्रकलेचा तास आमचा कलादालनात व्हायचा एक छोटीसी खोली होती तिकडे आमचा चित्रकलेचा सरांनी त्यांची प्रतिभाशक्ती वापरून बरेच चित्र काढून लावलेले असायचे आणि ते तास तिकडेच घायचे अगदी दाटीवाटीने अख्खा वर्ग त्या कलादालनात बसायचा , दिवाळीचा आणि उन्हाळ्याचा सुट्ट्या म्हणजे धमाल असायची कारण कॉलनी मधला मित्र मैत्रिणी सोबत पण तेवढीच मजा करयचो ..! शाळेत असताना पहिला बाकावर बसण्याची धडपड चालायची आणि कॉलेज मध्ये असताना शेवटचा बाकावर बसण्यासाठी .. :-P
मला अजून ही आठवतंय माझा शाळेतला जिवलग मैत्रिणीचा वाढदिवस होता आम्ही कायम सोबत असायचो त्याही दिवशी मी तिचा सोबतच होते पण मी तिचा वाढदिवस विसरले आणि तिला विश पण नव्हतं केलं मग ती जाम चिडली होती माझावर अर्थात ते चिडणं साहजिक होतं आणि तेंव्हा बर्थडे रेमिन्देर वगैरे प्रकार नसायचा पण त्या रुसव्या फुग्व्यात आणि भांडणात पण मैत्री असायची
पाहिजे ती गोष्ट रडून हट्ट करून मिळायची लहानपणी , खरच व . पु . म्हणतात तसा " आठवणी या मुंग्यांचा वारुळा प्रमाणे असतात वरून अंदाज नाही लावता येत किती आहेत पण एक बाहेर पडली कि तिचा पाठोपाठ असंख्य मुंग्या बाहेर पडतात आणि तशाच आठवणी आठवतायेत पण लिहून लिहून हात दुखतील पण आठवणी काही थांबायचा नाहीत पण त्या कायम काहीतरी शिकुउन जातात ,लक्षात राहतात , प्रसंगी रडवतात आणि कधी हसवतात ही
पण असो मी स्वतःला खूप नशीबवान समजते कारण अजून ही माझा सोबत त्या शाळेतल्या आणि कॉलेज मधला मैत्रिणी सोबत आहेत, शाळेतला आणि कॉलेजमधला आठवणीना उजाळा दायला आणि खळखळून हसायला ,अशाच छान छान आठवणींचा साठवणी प्रत्येकाकडेच असतील...
पण पुन्हा ते दिवस नक्कीच नाही परत येणार हेच खरं !!

hey...masta lihilayas...waachunch kaltay tu lahanpani kiti maja keli asshil...!
ReplyDeletehmm.. laukarach college lyf baddal lihinacha vichar ahe letz c ;)
Deleteशाळा म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय ..
ReplyDeleteआणि ह्या वयात तर शाळेच्या आठवणी आणि कॉलेजच्या आठवणीमध्ये रमण्यात एक वेगळाच आनंद मिळतो :)
छान झाला आहे लेख ..
धन्यवाद !!
Deleteyaar tu man yaa naa maan....!!!
ReplyDeletetu bahot age ja sakti hai..........!!
ashich lihit raha :-)
Kd : असच प्रोत्साहन मिळालं तर नक्की आवडेल काहीतरी छान लिहायला :-)
Deleteशाळा मी कधी पहाणर मला माहित नाही..मात्र शाळा पुस्तक वाचल्यावर एक असं पुस्तक मुलींसाठी पण हव होत असं वाटत.....
ReplyDeleteही पोस्ट छान लिहिलस...पुढील लेखनासाठी शुभेच्छा...:)
खूप धन्यवाद अपर्णा !!
ReplyDelete