 |
| का कळेना.......?? |
कधी कधी खरच कळत नाही काय करावं ? जशी एखादी नाव भरकटते वाऱ्या सोबत ती कुठल्या दिशेने जातीये ?, कशी जातीये ? का जातीये ?अगदी तसच होतं बऱ्याचदा , अनेक न सुटणारे प्रश्न पडतात आणि न कळत गुंता वाढत जातो , कळत असतं खूप अडकतिये - अडकतिये, आणि सुटण्यासाठी धडपड सुरु होते , पण मागे जाऊ शकत नाही आणि पुढचा मार्ग सापडत नाही , आणि मनात अचानक विचार येतो का पळतोय आपण न सुटणाऱ्या प्रश्नाच्या मागे जेंव्हा कि अशा प्रश्नांची उत्तर शोधायचीच नसतात जे कायम अनुत्तरीतच असतात , मुळात पळत्या गोष्टींच्या पाठी पडून का करून घेतो आपण स्वतःचाच जीवाची घालमेल आणि कायम दुखी राहतो आणि वाटत आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींमध्ये समाधान न मानण्याचा आणि दुखी राहणाचा शापच मिळालाय जणू मानव जातीला , असे अनेक प्रश्न एका एकी स्वतःलाच स्वतःमध्ये हरउन नेतात विचारांच्या गर्दीत खरच नकळत पणे " का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन असे ...??? "
khass..!! :)
ReplyDelete