Thursday, July 19, 2012

कुठेतरी वाचलेलं पण मनाच्या खूप जवळ वाटलेलं असं काहीतरी ...


एक गवताचं पातं होतं.. !

रानावनात उगवणारं अन रानावनातच झीजणारं..

उन्हाळ्यात सुरकुतणारं - पावसाळ्यात भरकटणारं..

चारचौघांसारखंच असणारं अन चारचौघांसारखंच दिसणारं..



पण एक दिवस काहीतरी वेगळंच घडलं..



आज सगळ्यांची नजर त्या पात्याकडे वळली..

आज ते पातं कुणाच्या चित्रात जाउन बसलं तर कुणाच्या आठवणींत..

कुणा कवीच्या कवितेत दिसलं, तर कुणा लेखकाच्या लेखात हसलं..



कारण..



कारण, आज त्या पत्यावर दंव बरसलं होतं.. एका दंवबिंदूने त्या पात्याला नवीन स्वरूप दिलं होतं..

आज ते पातं स्वतःशीच हसत होतं, मनाशीच खुलत होतं..

आता उन असो वा पाउस, रात्र असो वा दिवस..

त्या दंवाने त्या पात्याला फक्त आणि फक्त खुश रहायला शिकवलं होतं..



आज त्या दंवाने त्या पात्याला स्वतःचं अस्तित्व मिळवून दिलं होतं........



4 comments:

  1. झकास,मस्त,सुंदर,सही,छान,आवडला...

    ReplyDelete
  2. khup chan chikki... aawdya aaplyala.. :)

    ReplyDelete