Monday, September 10, 2012

वाचलेलं आवडलेलं...!

जेव्हा माणसं भेटतात...
तेव्हा आपण दुसरीकडे गुंतलो असतो....
रस्ते सापडतात तेव्हा आंपण already दुस-या वाटा निवडलेल्या असतात...
जेव्हा त्या वाटांपाशी येतो तेव्हा पावलं थकलेली असतात.........
जेव्हा पावलांत जोम येतो... तेव्हा न जाणे कुठली भिरभिरती फुलपाखरं वाटांवरून भटकत दूर नेतात...
जेव्हा पाउस पडणार असतो तेव्हा आपण भिजायला बाहेर पडणार नसतो....
जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा पाउस पडणार नसतो...
जेव्हा आठवण उतू जाते..... तेव्हा मोबाईल ला रेंज नसते....
जेव्हा कॉल येतो तेव्हा आपण बिझी असतो....
जेव्हा आवाज तापला असतो तेव्हा तानपुरा लागतं नाही,
आणि जेव्हा तारा जुळलेल्या असतात-
संध्याकाळ तेव्हा सरून गेली असते...............
कुठवर चालणार हा पाठशिवणीचा खेळ....
सुख क्षणांनो कधीतरी गाठाल का चांदणवेळ???

No comments:

Post a Comment