आज बेधुंदहून पडलेल्या पावसाने माझ्या मनाच्या तारा पुन्हा छेडल्या आणि अलगद निघणाऱ्या सुरांनी पुन्हा हळूच कागदावर येण्याची साद घातली ,असा एप्रिल महिन्यात अचानक पणे पडणाऱ्या पावसाचा आनंद म्हणजे जुन्या jeans चा pocket मध्ये अचानक सापडणाऱ्या पैशा सारखाच आहे अगदी अनपेक्षित .
तो मात्र बाहेर बेभान होऊन काळ्याभोर रस्त्यावर अगदी मनसोक्त नाचतोय , झाडा फुलांना चिंब भिजावतोय आणि थेंब होऊन पसरतोय , कडे कपारी खाच-खळग्यान्मधून तो ओसंडून वाहतोय ,या तापलेल्या सूर्याला झेलणाऱ्या धरणीला आज थोड्या वेळ का होईना चैतन्याची जाणीव करून देतोय , स्वतःच हिरवं रुपडं दाखून तहानलेल्या जीवांना सुखद करतोय , पुन्हा वातावरणात नव चैतन्य निर्माण करतोय , भरभरून "जगा आणि जगू द्या" सिम्पल लाइफ चा फंडा तो केवढ्या सहजपणे सांगतोय
या पावसाने पुन्हा लहानपणाची आठवण करून दिली , वाटलं पुन्हा लहान व्हावं आणि चिंब भिजावंपावसात अगदी मनसोक्त रस्त्यावर उनाडावं आपल्या मैत्र परिवारासोबत,कागदाच्या होड्या सोडाव्यात त्या साचलेल्या पाण्यात , एकमेकांच्या अंगावर पाणी उडवाव , कुठलेही बंधन नाही कुठलीही सीमा नाही निरागसपणे या निसर्गाचा सोहळ्याचा आनंद लुटावा मन भरून ते सजलेलं हिरव रुपडं बघावं ,आणि स्वतःलाच स्वतःमध्ये हरउन द्यावं , पुन्हा तो "आजारी पडशील पावसात भिजून" म्हणून आई चा ओरडा खावा आणि तरीही न ऐकलाचे नाटक करत पुन्हा त्या पावसात स्वतःला झोकून द्यावं अस वाटतंय , खरचं हे सगळं कुठेतरी हरवलाय पण या पावसाने पुन्हा बरसून जुन्या आठवणीना उजाळा दिला आणि ऑफिस मध्ये बसल्या बसल्या बालवयाची सैर करून आणलं काही क्षणात .....!!
![]() |
पाउस आला रे पाउस आला............ |