Sunday, February 05, 2012

एक उनाड मैत्री ...........!!!!



अशीच एक उनाड मैत्री
     
 मैत्री .. मैत्री ..मैत्री .. आपल्या सगळ्यांचाच आयुष्याचा एक अविभाज्य घटक  मग ती बालपणीची असो किंवा कॉलेजचा दिवसांमधली असो ....ती आहे म्हणून तर या जगण्याला खरा अर्थ आहे नाहीतर सगळं जगणं केवढं निरस झाल असतं नई...!
कदाचित मी ही याला अपवाद नाहीये  !!
 अशीच एक उनाड मैत्री सुरु झाली ती इंगीनीरिंग first एअर  चा अगदी पहिला दिवसापासून जी आजतागायत तशीच untouched आहे ... !
i  have  a  count of  each n  everyday 's masti n fun we have done .. :)
कॉलेजचा एक  एक  वर्षाप्रमाणे ती मैत्री हळू हळू कशी फुलत गेली आणि कधी रोजचा आयुष्याचा अविभाज्य घटक झाली कळलच नई ...अजून ही ते कॉलेज चे दिवस आठवतात अगदी जसेच्या तसे ..केलेला आगाऊपणा .. रोज संध्याकाळी उनाडक्या करत भटकायचो आमचा bike वर called  skooty ... पाणीपुरी खायचो रोज अगदी नचुकता ,रोज वेगवेगळा मंदिरांचा कट्ट्यांवर बसून मारलेला गप्पा जेवढ्या आम्ही कॉलेज कट्ट्यावर पण मारलेला नसतील .. केलेले stuppid discussuions, gaussips ..including how ve r differnt than others & why v dn need (rather have ;-P) boyfrns ...:-P :-P गाडीवर जाताना एका कानात ती आणि दुसऱ्या कानात मी असे headphones घालून आमच्या style चे songs ऐकायचो .. गाडीवरून जाताना केलेले वेगवेगळे obsevations & conclusions ... मारलेले taunts ... &&&&& stuppid poses given fr photusession.. as ve both r crazzy abt photugraphy n photusession :-) ....first yr मध्ये असताना एक "उन -पाऊस" नावाचं सेरीअल लागायच त्याचातला जो अनिकेत विश्वासराव होता त्याला बघण्यासाठी mechanics चे lecture bunk  करायचो  उसके लिये तो दिवाने थे हम लोग... ;) ;-P
हान आणि अजून एक गोष्ट म्हणजे आमचं एक  "chit -chat " account असायचं कॉलजमध्ये आम्ही बोरिंग lectrsमध्ये वापरायचो ..तर  "chit -chat " account  म्हणजे काय तर ती एक वही होती .. बोरिग lectrs मध्ये  आम्हला दोघींना बोलता नाही यायचा आणि अशा बराच गोष्टी असायचा कि आम्हला तिकडे बोलाव्या वाटायचा मग या  "chit -chat " notebook  मध्ये आम्ही एकमेकीना commnt करायचो ..क्लास मध्ये बरेच प्रसंग असे असतात की ते थोडे फार लक्षात असतात पण त्या क्षणी बोललेले ते वाक्य लक्षात नाही राहत पण या "chit -chat " account  मुळे अजूनही ते प्रसंग आमचा साठवणीत आहेत rite from  madam ने कसं ड्रेसिंग केलंय , त्यांचा hairstyles , त्यांची बोलण्याची  एक style ,lectr  चालू असताना कुठला मुलाला कोणाचा sms आला ..कुठला मुलगा कुठला मुलीकडे बघतोय अस सगळं सगळं आम्ही तिकडे note करायचो ..it ws stuppid पण आजही ती वही ( "chit -chat " account)काढून वाचताना सगळं जासचा तसा आठवतं .
       परीक्षेचा काळात थोडं भटकायला आणि गाणे ऐकायला कंट्रोल करावं लागायचं ..थोडं तस अवघडच जायचा पण करायचो , अभ्यास पण मिळूनच करायचो .. तरी पेपरचा आदल्या दिवशी एकमेकीना cal करून काय यार काहीच नाही झालं माझं हे ठरलेलं असायचा कायम मग परीक्षा हाल मध्ये जाईपर्यंत discuss करायचो आणि पेपर संपल्यावर लढाई जिंकलासारखा वाटायचं .. कधी एकदा परीक्षा संपेल असा वाटायचा पण खरच तेच दिवस खूप भारी होते
        खूप वेळा वाटायच काय यार आपण मुली का आहोत ...मुल असतो तर  रात्री बे रात्री भटकलो असतो फुल ओन आगाऊ पणा केला असता कारण मुलीना कायम कुठेतरी restrictions येतात ..पण असो मुली असून पण आम्ही मुलांपेक्षा काही कमी कॉलेज एन्जोय नाही केल खूप छोटंसं जग होतं पण खूप मजा केली ..कॉलेज संपतानाच कुठेतरी माहिती होतं की हे सगळं असच नाही राहणार या कॉलेज च ऑफिस होईल ..जर्नल्स मीटिंग पेपर मध्ये रुपांतरीत  होतील ..कायम "Perfect back benchers " असणाऱ्या आम्ही दोघी सोबत नसू अजून नवीन लोक भेटतील पण ठरवल होतं की दोघींनी हि आपापल्या मेहनतीने पैसा कमवायचा आणि खूप मजा करायची आपला style  ची shopping  करायची , आपल्या पैश्याने कॅमेरा घायचा .. busy आयुष्यातून stuppid गोष्टींसाठी तसाच वेळ  काढायचा जो पूर्वी असायचा आणि जे ठरवलं ते करून दाखवलाही ...!!
Mru

 पण पण .. थोडे दिवसात दोघींचं आयुष केवढं बदलेल दोघी जनी कोणाचातरी बायका असू कोणाचातरी सून असू , कोणाचातरी काकू असू , कोणाचातरी वाहिनी असू .. केवढी जबाबदारी असेल , नौकरी आणि संसार सांभाळणं एक दोरीवरची कसरत असेल .. कदाचित खूप इच्छा असून पण एकमेकीना भेटायला,निवांत बसून खळखळून हसायला पण वेळ नाही मिळणार, इतक्या एकमेकींचा संसारात गुरफटून जाऊ .. त्या आगाउपणा करण्यात कदाचित maturity असेल आणि Inocence कुठेतरी कायमचा हरउन जाईल ..ती किडेगिरी , त्या उनाडक्या फक्त आठवणींचाच साठवणी नको व्हायला एवढच देवाकडे मागेन !!

Adi

 म्हणतात ना , जेवणानंतर जशी Sweet dish जेवणाला छान रंगत देते आणि एक गोडवा देऊन जाते तशीच " मैत्री "असते प्रत्येकाचा आयुष्याला कायम गोडवा देणारी ...!

Monday, January 23, 2012

आठवणींचा साठवणी !!!

शाळा सुटली , पाटी फुटली .........

      "शाळा" चित्रपट पहिला ते हि शाळेतलाच मैत्रिणीसोबत आणि सगळ्या शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या आणि वाटला पुन्हा पाहिलापासून तो शाळा ते कॉलेज चा प्रवास करता आला तर केवढं भारी होईल ना...!
ते पुन्हा सगळा गृहपाठ , वर्गपाठ आणि ते वेळेत पूर्ण नाही झाला म्हणून सांगितलेली काहीही करण आणि  खाल्लेला बाई चा ओरडा , सगळ्यात आधी हात वर करून प्रश्नाचा उत्तर कोण देणार म्हणून लागलेली पैज , पडणारे असंख्य निरागस प्रश्न ..पेन , वह्या , डबे  हे  आपला स्वतःचा किती ही चांगला असला तरी नेहमी मैत्रिणीच आवडायचा आणि  मग आदलाबदल करण्यात पण एक वेगळीच मजा असायची ,  पी टी चा तास जाम आवडायचा अगदी वाट बघायचो , चित्रकलेचा तास आमचा कलादालनात व्हायचा एक छोटीसी खोली होती तिकडे आमचा चित्रकलेचा सरांनी त्यांची प्रतिभाशक्ती वापरून बरेच चित्र काढून लावलेले असायचे आणि ते तास तिकडेच घायचे अगदी दाटीवाटीने अख्खा वर्ग त्या कलादालनात बसायचा , दिवाळीचा आणि उन्हाळ्याचा सुट्ट्या म्हणजे धमाल असायची कारण कॉलनी मधला मित्र मैत्रिणी सोबत  पण तेवढीच मजा करयचो ..! शाळेत असताना पहिला बाकावर बसण्याची धडपड चालायची आणि कॉलेज मध्ये असताना शेवटचा बाकावर बसण्यासाठी .. :-P
      मला अजून ही आठवतंय माझा शाळेतला जिवलग मैत्रिणीचा वाढदिवस होता आम्ही कायम सोबत असायचो त्याही दिवशी मी तिचा सोबतच होते पण मी तिचा वाढदिवस विसरले आणि तिला विश पण नव्हतं केलं मग ती जाम चिडली होती माझावर अर्थात ते चिडणं साहजिक होतं आणि तेंव्हा बर्थडे रेमिन्देर वगैरे प्रकार नसायचा पण त्या रुसव्या फुग्व्यात आणि भांडणात पण मैत्री असायची
   पाहिजे  ती गोष्ट  रडून हट्ट करून मिळायची लहानपणी , खरच व . पु . म्हणतात तसा " आठवणी या मुंग्यांचा वारुळा प्रमाणे असतात वरून अंदाज नाही लावता येत किती आहेत पण एक बाहेर पडली कि तिचा पाठोपाठ असंख्य मुंग्या बाहेर पडतात आणि तशाच आठवणी आठवतायेत पण लिहून लिहून हात दुखतील पण आठवणी काही थांबायचा नाहीत पण त्या कायम काहीतरी शिकुउन जातात ,लक्षात राहतात , प्रसंगी रडवतात आणि कधी हसवतात ही
                            पण असो मी स्वतःला खूप नशीबवान समजते कारण अजून ही माझा सोबत त्या शाळेतल्या आणि कॉलेज मधला मैत्रिणी सोबत आहेत, शाळेतला आणि कॉलेजमधला आठवणीना उजाळा दायला आणि खळखळून हसायला ,अशाच छान छान आठवणींचा साठवणी प्रत्येकाकडेच असतील...
पण पुन्हा ते दिवस नक्कीच नाही परत येणार हेच खरं  !!



Friday, January 13, 2012

"जो भी मैं केहना चाहु , बरबाद करें अल्फाझ मेरे ... "

या Blog वर माझाविषयी मी जे काही लिहिलंय ते वाचून समोरचा असा विचार करत असेल कदाचित या मुलीला अखंड बडबड करण्याची सवय आहे तरीही हिचा मनात काही गुपितं असू शकतात का ?? याचावर मी असा म्हणेन कि काही गोष्टी प्रत्येकाचा आयुष्यात अशा असतात कि त्या कोणाच समोर नाही व्यक्त करता येत आणि मनात ठेवणं तर त्याहून हि कठीण माझासारखा बडबड करणाऱ्या लोकांना.. पण असो या Blog ने माझा सारखा अनेकांना एक सुवर्णमध्य दिलाय आपल वयाक्तिक मत मांडणासाठी .. Thanks to blogger.com!!
 ते माझा एक आवडत गाणं आहे  Rockstar mvi  मधलं " jo bhi main kehna chahu , barbaad karein alfaaz mere " म्हणून मनातले विचार बोलून न दाखवता लिहून ठेवलेलेच बरे  :-P ;-P

Saturday, January 07, 2012

मनातलं गुपित शब्दांचा रुपात ....

अनेकदा खूप गोष्टी बोलायचा राहून जातात आणि मग त्या मनातच राहतात अशा गोष्टी शब्दांचा रूपाने लिहून व्यक्त करणं जास्त सोयीचा होतं त्या साठी असलेलं एक हक्काचा टिकाण जिकडे मी वाट्टेल ते वाट्टेल तेंव्हा व्यक्त करू शकते ...अगदी मनसोक्त ....

Friday, January 06, 2012

किडेगिरी एक उनाड खुळेपणा !

life is only abt living KAMINAGIRI KIDEGIRI FALTUGIRI So khob Enjoygiri karne ka aur fulltoo DADAGIRI se jineka bole to ZNMD