Monday, September 10, 2012

वाचलेलं आवडलेलं...!

जेव्हा माणसं भेटतात...
तेव्हा आपण दुसरीकडे गुंतलो असतो....
रस्ते सापडतात तेव्हा आंपण already दुस-या वाटा निवडलेल्या असतात...
जेव्हा त्या वाटांपाशी येतो तेव्हा पावलं थकलेली असतात.........
जेव्हा पावलांत जोम येतो... तेव्हा न जाणे कुठली भिरभिरती फुलपाखरं वाटांवरून भटकत दूर नेतात...
जेव्हा पाउस पडणार असतो तेव्हा आपण भिजायला बाहेर पडणार नसतो....
जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा पाउस पडणार नसतो...
जेव्हा आठवण उतू जाते..... तेव्हा मोबाईल ला रेंज नसते....
जेव्हा कॉल येतो तेव्हा आपण बिझी असतो....
जेव्हा आवाज तापला असतो तेव्हा तानपुरा लागतं नाही,
आणि जेव्हा तारा जुळलेल्या असतात-
संध्याकाळ तेव्हा सरून गेली असते...............
कुठवर चालणार हा पाठशिवणीचा खेळ....
सुख क्षणांनो कधीतरी गाठाल का चांदणवेळ???

Tuesday, July 24, 2012

कधी कधी वाटतं .....!




शांतपणे पडून आकाशातलं चांदणं डोळ्यात भरून घ्यावं.. !





खुला रस्ता , सुसाट वेग , मैत्र परिवार आणि मस्त
 एक Long Drive घ्यावा !






फुलपाखरू व्हावं आणि फुलांच्या प्रत्येक पाकळीला अलगद स्पर्श करावा आणि रंगांची उधळण करावी !





बालवयाची सैर करावी आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी निरागसपणे पुन्हा अनुभावाव्यात !





कॅमेरा घ्यावा आणि सुसाट सुटावा प्रत्येक सुंदर क्षण Catch करत !









CCD मध्ये COFFEE चे MUG , मैत्र परिवार आणि प्रत्येक घोट घ्यावा stuppid gaussips करत  !









हातातली छत्री सोडून चिंब भिजावं पावसात आणि त्या प्रत्येक थेंबाचा आस्वाद घ्यावा !














किती ही काम असल ऑफिस मध्ये तरीही वेळ काढून Choclate Shott  मारावाच !










आईच्या हातची गरम गरम पुरणपोळी आणि साजूक तूप वाट्टेल तेंव्हा खाता यावं :-)










निवांत वेळ काढून Headphones कानात टाकावेत आणि जुनी गाणी ऐकत बसवीत !









सगळं विसरून झोपी जाव लहान मुल झोपतं अगदी तसच !





आणि




     खऱ्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीनी दुःखी होणापेक्षा स्वप्नांच्या  जगात राहता यावं ...!!! 

Thursday, July 19, 2012

कुठेतरी वाचलेलं पण मनाच्या खूप जवळ वाटलेलं असं काहीतरी ...


एक गवताचं पातं होतं.. !

रानावनात उगवणारं अन रानावनातच झीजणारं..

उन्हाळ्यात सुरकुतणारं - पावसाळ्यात भरकटणारं..

चारचौघांसारखंच असणारं अन चारचौघांसारखंच दिसणारं..



पण एक दिवस काहीतरी वेगळंच घडलं..



आज सगळ्यांची नजर त्या पात्याकडे वळली..

आज ते पातं कुणाच्या चित्रात जाउन बसलं तर कुणाच्या आठवणींत..

कुणा कवीच्या कवितेत दिसलं, तर कुणा लेखकाच्या लेखात हसलं..



कारण..



कारण, आज त्या पत्यावर दंव बरसलं होतं.. एका दंवबिंदूने त्या पात्याला नवीन स्वरूप दिलं होतं..

आज ते पातं स्वतःशीच हसत होतं, मनाशीच खुलत होतं..

आता उन असो वा पाउस, रात्र असो वा दिवस..

त्या दंवाने त्या पात्याला फक्त आणि फक्त खुश रहायला शिकवलं होतं..



आज त्या दंवाने त्या पात्याला स्वतःचं अस्तित्व मिळवून दिलं होतं........



Wednesday, April 25, 2012

Photugraphy !!!!


मला निसर्गात रमायला प्रचंड आवडत त्याच निसर्गाचा सहवासात मैत्र परिवारासोबत घालवलेला थोडा वेळ ,
निसर्गाने शिकवलेल्या काही गोष्टी आणि उनाडक्या करताना ,
डोळ्यांनी फिल केलेले आणि कॅमेऱ्यातून कैद केलेले काही सुंदर क्षण .......



"Bond with Bands "



या गड- किल्ल्यांनी तत्स्थापना शिकवला ..


जणू काही हिरवा शालू पांघरलाय ..
  

कष्टाची भाकर ...
 
एक रम्य पहाट


An open road.......


रंगुनी रंगात साऱ्या ...


लाटांसोबत खेळणाऱ्या नावा ...



मुळशीचा रुबाब !


कशाची ही पर्वा न करता अविरतपणे कोसळणारा धबधबा!

खारुताई..........
 
एक सुंदर क्षण !


एक क्षण ..!

अथांग पसरलेला समुद्र !


फुलले रे क्षण माझे ..!


घारी घारी घे भरारी ..!

समुद्राचा लाटांना पेलत तटस्थपने उभारलाय तो किल्ला


नारायणाची एक छबी..
 
खडकवासल्याची शांतता !
 
" पुणे तिथे काय उणे "
 
धन्य तो निसर्ग राजा  !


Thursday, April 19, 2012

चिंब भिजलेले रूप सजलेले ............



पाउस आला रे पाउस आला............

             आज बेधुंदहून पडलेल्या पावसाने माझ्या मनाच्या तारा पुन्हा छेडल्या आणि अलगद निघणाऱ्या सुरांनी पुन्हा हळूच कागदावर येण्याची साद घातली ,असा एप्रिल महिन्यात अचानक पणे पडणाऱ्या पावसाचा आनंद म्हणजे जुन्या jeans चा pocket मध्ये अचानक सापडणाऱ्या पैशा सारखाच आहे अगदी अनपेक्षित .
तो मात्र बाहेर बेभान होऊन काळ्याभोर रस्त्यावर     अगदी मनसोक्त नाचतोय , झाडा फुलांना चिंब भिजावतोय आणि थेंब होऊन पसरतोय , कडे कपारी खाच-खळग्यान्मधून तो ओसंडून वाहतोय ,या तापलेल्या सूर्याला झेलणाऱ्या धरणीला आज थोड्या वेळ का होईना चैतन्याची जाणीव करून देतोय , स्वतःच हिरवं रुपडं दाखून तहानलेल्या जीवांना सुखद करतोय , पुन्हा वातावरणात नव चैतन्य निर्माण करतोय , भरभरून "जगा आणि जगू द्या"  सिम्पल लाइफ चा फंडा तो केवढ्या सहजपणे सांगतोय 

या पावसाने पुन्हा लहानपणाची आठवण करून दिली , वाटलं पुन्हा लहान व्हावं आणि चिंब भिजावंपावसात अगदी मनसोक्त रस्त्यावर उनाडावं आपल्या मैत्र परिवारासोबत,कागदाच्या होड्या सोडाव्यात त्या साचलेल्या पाण्यात , एकमेकांच्या अंगावर पाणी उडवाव , कुठलेही बंधन नाही कुठलीही सीमा नाही निरागसपणे या निसर्गाचा सोहळ्याचा आनंद लुटावा मन भरून ते सजलेलं हिरव रुपडं बघावं ,आणि स्वतःलाच स्वतःमध्ये हरउन द्यावं , पुन्हा तो "आजारी पडशील पावसात भिजून" म्हणून आई चा ओरडा खावा आणि तरीही न ऐकलाचे नाटक करत पुन्हा त्या पावसात स्वतःला झोकून द्यावं अस वाटतंय , खरचं हे सगळं कुठेतरी हरवलाय पण या पावसाने पुन्हा बरसून जुन्या आठवणीना उजाळा दिला आणि ऑफिस मध्ये बसल्या बसल्या बालवयाची सैर करून आणलं काही क्षणात .....!!
            

Thursday, March 22, 2012

" का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन असे ...??? "

का कळेना.......??
कधी कधी खरच कळत नाही काय करावं ? जशी एखादी नाव  भरकटते वाऱ्या सोबत ती कुठल्या दिशेने जातीये ?, कशी जातीये ? का जातीये ?अगदी तसच होतं बऱ्याचदा , अनेक न सुटणारे प्रश्न पडतात आणि न कळत गुंता वाढत जातो , कळत असतं खूप अडकतिये - अडकतिये, आणि सुटण्यासाठी धडपड सुरु होते , पण मागे जाऊ शकत नाही आणि पुढचा मार्ग सापडत नाही , आणि मनात अचानक विचार येतो का पळतोय आपण न सुटणाऱ्या प्रश्नाच्या मागे जेंव्हा कि अशा प्रश्नांची उत्तर शोधायचीच नसतात जे कायम अनुत्तरीतच असतात , मुळात पळत्या गोष्टींच्या पाठी पडून का करून घेतो आपण स्वतःचाच जीवाची घालमेल आणि कायम दुखी राहतो आणि वाटत आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींमध्ये समाधान न मानण्याचा आणि दुखी राहणाचा शापच मिळालाय जणू मानव जातीला , असे अनेक प्रश्न एका एकी  स्वतःलाच स्वतःमध्ये हरउन नेतात विचारांच्या गर्दीत खरच नकळत पणे " का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन असे ...??? "

Friday, March 02, 2012

मन आणि मेंदू !!


"मन आणि मेंदू " या विषयावर लिहायचं म्हणजे व. पु. च हे वाक्य आठवल्याशिवाय नक्कीच राहणार नाही

       "माझ्या मनाचा माझ्या मेंदूशी छत्तीसचा आकडा आहे"
       "माझं मन तसं सरळ आहे या मेंदूचाच रस्ता वाकडा आहे"

माणसाचं मन आणि आणि मेंदू हे दोन्ही एकच असत का वेगवेगळ हा प्रश्न कायम पडतो आणि तो प्रश्न माझ्यासाठी
तरी अनुत्तरीतच राहिलाय अजूनही , मेंदूला मन असतं की मेंदू म्हणजेच मन?’ या प्रश्नाच्या उत्तरासाठी जेवढे खोल जावे तेवढे आपण अधिकच गुंत्यात अडकतो.
             आता बघा , जर आपण "मेंदू हेच मन " असं गृहीत धरलं तर कधी ऐकलय का कुठलं गाणं असं " मेंदू तळ्यात - मळ्यात " किंवा " मेरा मेंदू क्योन तुम्हे चाहे ?  "  मेंदू म्हणजे काय ते आपल्याला माहीत असतं. मेंदू दाखवता येतो, पाहता येतो (जरी आपला स्वत:चा मेंदू कुणी प्रत्यक्ष पाहू शकत नसलं, तरी!). याउलट जर मन हे वेगळं काहीतरी आहे मेंदू पेक्षा तर मग हा "मन " नावाचा अवयव नक्की कुठे असतो मानवी शरीरात ..?? हे आजपर्यंत कोणी दाखवलेलं ऐकिवात नाही आलं कुठे ? 
आपण कायम असं म्हणताना ऐकत असतो rather रोजच्या आयुष्यात म्हणत असतो कि अमुक अमुक व्यक्ती मनात आहे , अमुक व्यक्तीचा मनात काही नसतं जे असत ते सगळं अगदी तोंडावर , आज अगदी मनसोक्त उनाडलो , मनापासून वाईट वाटलं , मनात आली ना एखादी गोष्ट मग नक्की करेन वगैरे  वगैरे  पण एकदाही आपल्या तोंडून मेंदू शब्दाचा कुठेच उल्लेख नाही होत. बुद्धी गोष्ट मेंदूशी निगडीत असणं हे सगळ्यांना पटतं ,आपण बुद्धीला चालना मिळणारे बरेच खेळ खेळतो जस कि बुद्धिबळ  , किंवा ते बाजारात उपलब्ध असतात पण कधी मनोबल वाढवणारे खेळ असं ऐकलय का ?? मी तरी ऐकलेलं नाही आठवत .
          असं हि ऐकत असतो कि माणसाचं मन खूप चंचल असत ते सारखं कुठेतरी भटकत असत , त्याचावर कंट्रोल हवं , एखादी व्यक्ती मनाने खूप हळवी आहे किंवा एखादी मनाने दगड आहे म्हणजे ती कायम बुद्धीनेच विचार करणारी असते का ? बुद्धिवादी माणसं कायम मेंदूने विचार करणारी असतात म्हणजे त्यांना मन नसतच का ??
आणि बऱ्याच वेळेस प्रेम हि गोष्ट अली कि मन या संकल्पनेची सांगड हृदयाशी घालतो . मग माणसाचं मन म्हणजे त्याचं हृदय असत का ?असे असंख्य प्रश्न पडतात पण अजून हि मनाजोगं आणि मेंदूला पटणार उत्तर नाही मिळालं !