डोळ्यांसमोर उभी राहतात त्यांच ते सोंदर्य, त्या रंग छटा, ती आकर्षकता म्हणजे ईश्वरी किमायागारीचा त्याच्या उत्तुंग कल्पनाशक्तीचा जणू जिवंत आविष्कार आहे याच्यापेक्षा वेगळी creativity असूच शकत नाही .. !
हि फुलं नुसती देखणी नसून आपल्याला रोजचा आयुष्यात पण बरच काही सांगून जातात जस की आपल्या जगण्यात कशी सहनशीलता , सृजनता, नम्रता, हवी? , किती हि संकटं आले तरी कस तटस्थपणे त्यांना तोंड देत कायम हसत मुख राहता येईल ? कसा आजूबाजूचा आसमंत आपल्या सुगंधाने अस्तित्वाने उजळून टाकता येईल ?त्यांचाकडे बघून जगण्यातलं नाविन्य कळतं, म्हणूनच प्रत्येक सुंदर क्षण फुलांशिवाय अपूर्णच.. !
माणसाने कितीही वैज्ञानिक प्रगती केली असेल, शेतकी शास्त्र किती ही प्रगत झाल असेल किती तरी संकरित फुलाफळांचा नवनवीन जाती निर्माण केल्या असल्या तरी त्या निसर्गाचा कल्पनाशक्तीला त्या फुलांचा रंगसंगतीला , त्याच्या विचारशक्तीला माणूस नाही challenge करू शकणार
फुलाच्या त्या प्रत्येक पाकळीचा स्पर्श ती त्याच्यातली कोमलता, आकर्षकता , कधी त्याला कवीच्या कवितेत नेऊन ठेवते सौंदर्याचा दाखला देण्यासाठी , तर कधी आजारपणातून उठणाऱ्या रुग्णाला जगण्याची नवी उमेद देण्यासाठी , कधी घरात येणाऱ्या पाहुण्यांचा आदर सत्कार करण्यासाठी, थोडक्यात काय तर
फुलांशिवाय प्रसन्नता असूच नाही शकत मग ते घर असेल किंवा मंदिर असेल कदाचित म्हणूनच हि फुले सर्वाना कायम हवीहवीशी वाटतात .
















